बिहार हे अपयशी राज्य, आता ते खड्ड्यात गेलंय; पोटनिवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले मत

महाराष्ट्रआणि झारखंडसह 10 राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणुकाही झाल्या. या निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकार प्रशांता किशोर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच बिहार आता खड्ड्यात गेला आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. त्यांनी कोणाचेही नाव न घेता राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अमेरिकेमध्ये बिहारी समुदायाशी संवाद साधताना प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सद्यस्थितीबाबत आपली भूमिका मांडली.

बिहारमधील विधानसभेच्या चार जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एनडीएने विजय मिळवला.तर नव्यानेच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाचा पराभव झाला होता. या निकालानंतर प्रशांत किशोर यांनी मोठे विधान केले आहे. प्रशांत किशोर यांनी बिहार हे एक अपयशी राज्य असल्याचं म्हटलं आहे. बिहार हे एक असं राज्य आहे जे अनेक बाजूंनी अडचणीत सापडलं आहे. जर बिहार हा एक देश असता तर तो जगातील 11 वा सर्वात मोठा देश असला असता. आम्ही लोकसंख्येच्याबाबतीत जपानला मागे टाकलं आहे. येथील समाज हा सुधारणांबाबत नाउमेद झाला आहे, हेच सर्वात मोठं आव्हान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.