अदानींकडून 100 कोटी रुपयांचा निधी घेणार नाही, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची भुमिका

तेलंगणा सरकारने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी निधी गोळा करायला सुरूवात केली आहे. या अभियानासाठी उद्योगपती गौतम अदानी 100 कोटी रुपये द्यायला तयार होते. पण हे पैसे आपण घेणार नाही अशी भुमिका मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मांडली आहे.

रेड्डी म्हणाले की यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी अनेक संस्थांनी निधी देऊ केला आहे. अदानी ग्रुपनेही 100 कोटी रुपये निधी देऊ केला आहे. पण काल आम्ही सरकारकडन अदानी कंपनीला पत्र लिहून हे पैसे घेण्यास नकार दिला आहे. आज मी पुन्हा सांगतोय की अदानी ग्रुपकडून आम्ही 100 कोटी रुपयांचा निधी स्विकारणार नाही असे रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.