भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, अंदमानात मासेमारी बोटीतून 5 टन ड्रग्ज जप्त

भारतीय तटरक्षक दलाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, तटरक्षक दलाने अंदमानच्या समुद्रात एका मासेमारी बोटीतून सुमारे पाच टन ड्रग्जची मोठी खेप जप्त केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेप असण्याची शक्यता आहे.

एएनआयने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय तटरक्षक दलाची ही सर्वात मोठी अमली पदार्थांची तस्करी असण्याची शक्यता आहे.