ऑस्ट्रेलिया विरूद्ध पर्थवर सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर करंडकातील पहिल्या लढतीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. कर्णधार जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स घेत टीम इंडियाला पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळून दिली. बुमराह याने 30 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांमध्ये गुंडाळला. त्याच्या या कामगिरीचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कौतुक केले.
विश्व समुद्रच्या गोल्डन ईगल गोल्फ चॅम्पियनशिपच्या आठव्या हंगामानिमित्त मैदानात उतरलेल्या कपिल देव यांनी माध्यमांची संवाद साधला. यावेळी त्यांनी जसप्रीत बुमराहचे नेतृत्व आणि त्याच्या गोलंदाजीतील कौशल्यावर भाष्य केले. कपिल देव यांनी बुमराहचे विशेष कौतुक केले. बुमराहचे अभिनंदन करायला हवे कारण खूप कमी वेळा गोलंदाजाला कर्णधार पद मिळते आणि त्याने ज्या पद्धतीने मैदानावर नेतृत्व केले हे पाहून आनंद वाटला असे कपिल देव म्हणाले.
विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहने एका डावात पाच विकेट घेण्याचा कारनामा अकराव्यांदा केला. तर सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये त्याने सातव्यांदा एका डावात पाच विकेट घेतल्या आणि कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
पार्थ कसोटी मध्ये टीम इंडिया सध्या मजबूत स्थितीत आहे. यशस्वी जयस्वाल याने ठोकलेल्या 161 विराट कोहलीच्या शतकी आणि के एल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने दुसरा डाव 487 धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर तिसरा दिवस संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाचे तीन विकेट्स मिळवत आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडिया चांगले प्रदर्शन करत असून पहिला कसोटी सामना पण जिंकायला हवा. आपण सकारात्मक विचार करायला हवा असे कपिल देव म्हणाले.