जम्मू-कश्मीरमध्ये रोहिंग्यांना भाड्याने घर देणाऱ्यांवर गुन्हे दाखल, कागदपत्रांची पडताळणी न करता दिला होता आसरा

जम्मू-कश्मीरमध्ये शरणार्थी किंवा निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांना भाडय़ाने घरे देणाऱया पाच घरमालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरमालकांनी या शरणार्थींकडून कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी न करता त्यांना आसरा दिला होता. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर पोलिसांनी घरमालकांविरोधात कारवाई केली. दरम्यान, जम्मू-कश्मीर प्रशासनाने सर्वच घरमालकांना घरे भाडय़ाने देताना पोलीस पडताळणी सक्तीची केली आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये कामगारांवर सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. त्यामुळे जम्मू-कश्मीर प्रशासनाने घरे भाडय़ाने देताना संबंधितांची संपूर्ण पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे जम्मूच्या सिधरा परिसरात संशयास्पद स्पह्टके आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी आज सकाळपासूनच शोधमोहीम राबवली. शनिवारी बारामूल्ला पोलिसांनी सुरक्षा दलांसोबत राबवलेल्या संयुक्त सुरक्षा मोहीमेदरम्यान कुंजर परिसरातील दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधून काढला होता. याचदरम्यान मलवा गावानजिक जंगलात शोधमोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रs आणि स्पह्टके हस्तगत करण्यात आली होती.