एसटीचे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे वर्षभरात 3 हजार 381 अपघात झाले आहेत. एसटी बसच्या अपघातांत सातत्याने वाढ होत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामंडळाने विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर चालकांचे समुपदेशन करण्यासाठी प्रत्येक आगारात समुपदेशकांची नियुक्ती केली जाणार आहे. विविध योजना व 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी अशा 30 पेक्षा अधिक घटकांना एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये शासनाद्वारे सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. मात्र, राज्यात महामंडळाच्या बसेस जुन्या झाल्याने एसटीच्या अपघातांत वाढ होत आहे.