मणिपूरमध्ये शाळा, महाविद्यालये बंदच राहणार

 

मणिपूरच्या इंफाळ खोऱयात आणि जिरीबाम जिह्यात आठवडाभरानंतर सोमवारपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱयांनी दिली होती. परंतु हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णूपूर, काकचिंग आणि जिरीबाम येथील शाळा आणि महाविद्यालये हिंसाचारानंतर लागू केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती.

मणिपूरमध्ये इंटरनेट सुरू करण्यात आले आहे. परंतु, हिंसाचार आणखी वाढू नये, अफवा पसरू नयेत यासाठी मोबाईल इंटरनेटबंदी कायम आहे.