महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या निकालाबाबत देशभरातून अविश्वसनीय अशीच प्रतिक्रिया उमटत आहे. कुछ तो गडबड आहे, असेच सर्वजण म्हणत आहेत. आता कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही निकालावर प्रश्न उपस्थित केले असून ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे प्रत्येक मतदारसंघात नाही, तर निवडक मतदारसंघामध्ये घडले. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत, असे जी परमेश्वरा यांनी म्हटले आहे.