ई-कॉमर्स कंपनी ‘मिंत्रा’ने क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश केला आहे. ‘एम -नाऊ’ असे ‘मिंत्रा’ च्या नव्या सेवेचे नाव आहे. या अंतर्गत बंगळुरूमधील ठरावीक भागांत दोन तासांच्या आत ऑर्डर डिलिव्हरी केली जाईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा प्रोजेक्ट सुरू झाला असून सध्या केवळ निवडक उत्पादनांची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे. पायलट प्रोजेक्टला मिळणाऱया प्रतिसादावर ही सेवा अन्यत्र सुरू केली जाईल.
‘फ्लिपकार्ट’ संलग्न ‘मिंत्रा’ या ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करणारे महाराष्ट्रात सुमारे चार कोटी ग्राहक आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 3,501 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये तो वार्षिक आधारावर 25 टक्क्यांनी वाढून 4,375 कोटी रुपये झाला आहे.