EVM मध्ये 100 टक्के घोटाळा; मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा आरोप, न्यायालयात दाद मागणार

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी महाराष्ट्र विधानसभा निकालात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. गेली दहा वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात काम करत आहे. शेकडो लोकांच्या सुखदुःखात मी सहभागी झालो. अनेकांच्या अडीअडचणीला धावून गेलो आहे. कोरोना, महापुरात लोकांना मदत केली आहे. जनतेच्या आग्रहामुळे मी ही निवडणूक लढविली होती.

माझ्या सभा, पदयात्रा यांना तुफान प्रतिसाद होता. मीच निवडून येणार असे संकेत असताना मला फक्त 2406 मते मिळाली आहेत. त्यामुळए हे निकाल धक्कादायक आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये 100 टक्के घोटाळा झाला आहे. पंढरपूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे आपण विधानसभा निकालाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.