जीव वाचविणाऱ्या ‘त्या’ देवदूतांना ऋषभ पंतने दिलं अनोख गिफ्ट, व्हिडीओ आला समोर

टीम इंडियाचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा दोन वर्षांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. मात्र त्यावेळी त्याच्या मदतीसाठी दोन तरुण देवदूत बनून धावले होते. त्यांनी पंतला कारमधून बाहेर काढले आणि तत्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र पंत त्या तरुणांनी त्याचा जीव बचावल्याने त्यांच्यासाठी दोघांना खास गिफ्ट दिले आहे.

30 डिसेंबर 2022 रोजी ऋषभ पंतचा रस्ते अपघात झाला होता. तो दिल्लीहून डेहराडूनला आपल्या घरी जात होता. मात्र त्यावेळी त्याची कार दिल्ली-डेहराडून महामार्गावरील दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर कारला भीषण आग लागली. पण एवढा गंभीर अपघात होऊनही ऋषभ पंतने मृत्यूला हरवलं आणि साखर कारखान्यात काम करणारे दोन जण त्याच्यासाठी देवदूत बनून आले. रजत आणि निशू अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी ऋषभला तत्काळ त्या गाडीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे ऋषभचा जीव वाचला. मात्र ऋषभ पंतही त्यांचे उपकार विसरला नाही. तो बरा झाल्यानंतर त्याने त्या दोघांची भेट घेतली. त्या दोघांनाही एक स्कूटी भेट दिली आणि आज दोघंही ती स्कूटी चालवतात. दोघांच्या स्कूटीवर ऋषभ पंत नाव लिहीले आहे. त्या दोघांमुळेच ऋषभ क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकला.

सध्या ऋषभ पंतशी संबंधित ऑस्ट्रेलियन मीडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋषभ पंतचे चाहते रजत आणि नीशूचे कौतुक करत आहेत. पंतने आयपीएलमधून पुनरागमन करत चांगली कामगिरी केली. यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमध्येही आपला फॉर्म दाखवून दिला. यानंतर टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा तो भागही होता.