टीम इंडियाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल आपल्या धमाकेदार खेळीने यंदा रेकॉर्ड केले आहे. ऑस्ट्रेलियासोबत सुरु असलेल्या पर्थ टेस्टच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावत प्रशिक्षक गौतम गंभीर याचा 16 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. तो आता टेस्ट क्रिकेटमध्ये वर्षभरता सर्वात जास्त धावा करणारा हिंदुस्थानी डावखुरा फलंदाज बनला आहे.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या नावावर 16 वर्ष हा रेकॉर्ड होता. 2008 मध्ये गंभीरने 8 टेस्ट सामन्यांमध्ये 1134 धावा काढल्या होत्या आणि तो वर्षातला पाचवा सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता. गंभीरने 70.87 च्या सरासरीने फलंदाजी केली होती. त्यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकं केली. 2008 मध्ये त्याने चांगली कामगिरी उत्कृष्ट होती आणि गंभीर व्यतिरिक्त, वीरेंद्र सेहवाग (1462 धावांसह दुसरे स्थान), व्हीव्हीएस लक्ष्मण (1086 धावांसह सहावे स्थान) आणि सचिन तेंडुलकर (1063 धावांसह नववे स्थान) हे देखील आघाडीच्या फलंदाजांमध्ये होते. वर्षातील टॉप 10 फलंदाजांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. या वर्षात म्हणजेच 2024 मध्ये 1209 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी दुसऱ्या क्रमांकावर आहे.