ठाणे ग्रामीण भागातही थैल्याच सरस ठरल्याचे दिसून आले. मुरबाडमध्ये भाजपचे किसन कथोरे निवडून आले असून महाविकास आघाडीचे सुभाष पवार यांना 1 लाख 23 हजार 117 मते मिळाली. अंबरनाथमध्ये मिंध्यांचे बालाजी किणीकर यांच्याविरोधात वातावरण होते. तरीही ते निवडून आले असून शिवसेनेचे राजेश वानखेडे यांनी 59 हजार 93 मते मिळवत त्यांच्याशी चांगलीच टक्कर दिली.
शहापूरमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा यांनी फक्त 1 हजार 672 मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीचे पांडुरंग बरोरा यांना 71 हजार 409 तर दरोडा यांना 73 हजार 81 मते मिळाली. उल्हासनगरात भाजपचे कुमार आयलानी निवडून आले असून आघाडीचे ओमी कलानी यांना 51 हजार 477 मते मिळाली.