मनसेची मान्यता धोक्यात? भोपळाही पह्डता आला नाही

महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी होण्याचे स्वप्न पाहणाऱया मनसेला विधानसभा निवडणुकीत भोपळा पह्डता आलेला नाही. या निवडणुकीत मनसेचा सुफडा साफ झाला असून प्रादेशिक पक्ष म्हणून पक्षाची मान्यताच धोक्यात आल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीत मनसेने 125 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरेलाही रिंगणात उतरवले होते. मात्र या प्रतिष्ठsच्या निवडणुकीत मनसेला एकमेव आमदारही राखता आला नाही. दरम्यान, या दारूण पराभवावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून ‘अविश्वसनीय, तूर्तास इतकेच!’ इतकीच प्रतिक्रिया दिली आहे.