अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यानंतर ‘एक्स’चे मालक एलन मस्क यांना चांगलाच फायदा झाला आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्क यांची नेटवर्थ 70 अब्ज डॉलरने वाढली आहे. टेस्लाचा स्टॉक गगनाला भिडत आहे. त्यांची एआय कंपनी ‘एक्सएआय’देखील गगनाला भिडत आहे. त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे अनेक कंपन्यांसह अब्जाधीशांची एकूण संपत्ती वाढत आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, 22 नोव्हेंबरच्या अहवालात मस्क यांची एकूण संपत्ती 340 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.
5 नोव्हेंबरनंतर नशीब बदलले
5 नोव्हेंबर रोजी झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुंतवणूकदारांनी एलन मस्क यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि टेस्लाच्या शेअरच्या किमतीत 40 टक्के वाढ झाली. मस्क यांची एकूण संपत्ती विक्रमी 321.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी 3.5 वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. त्यांची संपत्ती 347.8 अब्ज डॉलर आहे.
मस्क यांच्या एआय कंपनीची भरारी
मस्क यांच्या एआय कंपनीचे मूल्य दुप्पट होऊन 50 अब्ज डॉलर झाले. मस्क यांच्या कंपनीतील 60 टक्के भागीदारीमुळे त्यांच्या संपत्तीत आणखी 13 डॉलरची अब्जची भर पडली आहे. निवडणुकीनंतर या कंपनीत 70 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.