ख्यातनाम संगीतकार ए.आर. रेहमान आणि त्यांच्या बँड सदस्य मोहिनी डे यांनी एकाच दिवशी त्यांच्या जोडीदारापासून विभक्त होण्याची घोषणा केली. 19 नोव्हेंबर रोजी रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी 29 वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच मोहिनी डे हिने पतीपासून घटस्फोट घेतल्याची चर्चा केली. या अफवांवर आता मोहिनीने मत मांडले. मोहिनीने म्हटलंय, मला मुलाखतींसाठी बोलावण्यात येत आहे. तसे खूप मेसेज येत आहेत. हे सर्व का होत आहे, हे मला माहीत आहे. यानंतर मोहिनीने तिच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्याचे आवाहन केले. ‘‘या अफवा वाढवण्याचा माझा कोणताही हेतू नाही. या गोष्टींवर माझा वेळ जाऊ नये, असे वाटतंय. कृपया माझ्या गोपनीयतेचा आदर करा,’’ असे मोहिनीने म्हटलंय.