एकचाकी सायकलने प्रवास करणारा अवलिया; केरळ ते कश्मीर… धाडसी सफर

एक चाक असलेल्या सायकलवरून केरळ ते कश्मीर अशा  धाडसी प्रवासाला निघालेल्या युवकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सानिद असे या युवकाचे नाव आहे. द ट्रव्हल डायरी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सानिदचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याच्या सायकलला पुढचे चाक नाही. तो मागच्या एका चाकावर सायकल चालवताना व्हिडीओत दिसतोय. केरळमधून निघालेला सानिद जेव्हा अमृतसरपर्यंत पोचला आहे. नेटिजन्स व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करून सानिदचे कौतुक करत आहेत.