ऋतुजा बागवेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

रंगमंच अभिनयासाठी संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार 2023 ने अभिनेत्री ऋतुजा बागवे हिला आज गौरविण्यात आले. ऋतुजाने या पुरस्कारासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबत दिलेल्या पॅप्शनमध्ये ती म्हणाली, ‘तुला कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडते असे विचारल्यावर मी क्षणाचाही विलंब न घेता उत्तर देते ‘नाटक.’ इतका मोठा मानाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जरा मनात धस्स झालं. मनात आलं आपण फार काम केलं नाहीये, आपण या पुरस्कारच्या पात्र आहोत का? पुढे ती म्हणाली, 22 एकांकिका, दोन प्रायोगिक नाटपं, तीन व्यावसायिक नाटपं केली. पण जे काम केलं जीव ओतून केलं एवढं मात्र नक्की आणि त्याची जेव्हा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते तो आनंद आत्मा सुखावणारा असतो. आणि यात मोलाचा वाटा आहे ‘अनन्या’ नाटकाचा. ‘अनन्या’ नाटकाचे मी 300 प्रयोग केले. या नाटकाने काwतुक, पुरस्कार, समाधान, प्रसिद्धी, पैसा, मायबाप रसिक प्रेक्षकांचे प्रेम खूप काही दिलं. आज हा पुरस्कार मी ‘अनन्या’ ला आणि माझ्या ‘अनन्या’च्या संपूर्ण टीमला समर्पित करते.