फार्मा कंपनीत गॅस गळती झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सांगलीत घडली. या दुर्घटनेत एक महिला ठार झाली असून चार कामगारासह दहाजण बाधित झाले आहेत. त्यांच्यावर कराडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाळगाव एमआयडीसीमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी फॉरेन्सिक विभागाचे पथक तपास करत आहेत, असे सांगली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी सांगितले.
कडेगाव तहसीलअंतर्गत शाळगाव एमआयडीसीमध्ये असलेल्या म्यानमार केमिकल कंपनीत गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खत निर्मिती प्रकल्पातील रिॲक्टरमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट झाला. यात दोन महिला कामगारांसह सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. विषारी वायूची बाधा झाल्याने राणी उथळे या शेजारील वस्तीवर राहणार्या महिलेला अत्यवस्थ स्थितीत रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. तर अन्य बाधित झालेल्या मध्ये माधुरी पुजारी, सायली पुजारी, हेमत पुजारी, किशोर पुजारी, मारूती थोरात, प्राजक्ता मुळीक, वरद मुळीक, शिवानी मुळीक, शुभम यादव आदींचा समावेश आहे.
बोंबाळेवाडी एमआयडीसीमध्ये मॅनमार ही रासायनिक खते तयार करणारी कंपनी आहे. गुरुवारी सायंकाळी येथील गळतीमुळे विषारी वायू एमआयडीसी परिसर आणि शेजारच्या वस्तीमध्ये पसरला. यामुळे डास घेताना अडचण, डोळ्यात जळजळ आणि उलट्या होऊन गंभीर त्रास होऊ लागल्याने कंपनीतील चार कामगार व परिसरातील सहा नागरिक अशा दहा जणांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खतनिर्मिती प्रकल्पातील अणुभट्टीचा स्फोट होऊन विषारी रासायनिक धूर निघत होता. यात युनिटमधील 12 जण प्रभावित झाले. जखमींपैकी सात जणांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी पाच जण सध्या आयसीयूमध्ये आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत अमोनिया वायूचा समावेश असल्याचा संशय सांगलीचे पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांनी व्यक्त केला आहे.