नौदलाचे जहाज मासेमारीच्या जहाजाला धडकले, 11 क्रू मेंबर्स बचावले, दोन बेपत्ता

MURMANSK REGION, RUSSIA - SEPTEMBER 15, 2020: The Russian Navy's Project 22350 frigate Admiral Kasatonov arrives at its place of service in Severomorsk from the Baltic Sea. The frigate is enlisted in the division of missile launching vessels of the Russian Northern Fleet, the largest Russian Navy's squadron of surface ships. Lev Fedoseyev/TASS Ðîññèÿ. Ìóðìàíñêàÿ îáëàñòü. Ôðåãàò ïðîåêòà 22350 "Àäìèðàë ôëîòà Êàñàòîíîâ" Ñåâåðíîãî ôëîòà ÐÔ, ïðèáûâøèé èç Áàëòèéñêà â Ñåâåðîìîðñê. Êîðàáëü çà÷èñëåí â ñîñòàâ äèâèçèè ðàêåòíûõ êîðàáëåé Ñåâåðíîãî ôëîòà ÐÔ - ñàìîãî êðóïíîãî ñîåäèíåíèÿ íàäâîäíûõ êîðàáëåé ÂÌÔ Ðîññèè. Ëåâ Ôåäîñååâ/ÒÀÑÑ

गोव्याच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या जहाजाशी नौदलाच्या जहाजाची टक्कर झाली. या जहाजावर 13 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन क्रू मेंबर्स अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. गोव्याच्या उत्तर-पश्चिमेला सुमारे 70 नॉटिकल मैल अंतरावर गुरूवारी ही घटना घडली.

मार्थोमा या भारतीय मासेमारी जहाजाशी नौदल युनिटची टक्कर झाली. त्यानंतर नौदलाची टीम बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली होती. शोधासाठी सहा जहाजे आणि विमानेही तैनात करण्यात आली आहेत.

मासेमारी जहाज आणि नौदल युनिटमध्ये टक्कर कशी झाली? हे अद्याप कळू शकले नाही. बचावकार्य संपल्यानंतर याबाबत तपास करण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, नौदलाने क्रू मेंबर्सचा शोध घेण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. नौदलाची अनेक पथके अपघातस्थळी बेपत्ता क्रू मेंबर्सचा शोध सुरू आहे.