भाजपच्या सावे यांनी पैसे वाटले, अनेक ठिकाणी बूथ ‘कॅप्चर’ केले! इम्तियाज जलील यांचा आरोप, पुराव्यांसह आयोगाकडे तक्रार

भाजप, शिवसेना (मिंधे गट) लढत असलेल्या विधानसभेच्या मतदारसंघात पैशांचा पाऊस पाडला गेला. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून कारवाई न करण्याचे आदेश असल्याने भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले. अनेक ठिकाणी बूथ कॅप्चर केले. याउलट माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मतदान काळातील गैरप्रकाराचे व्हिडिओसह पुरावे आणि कारवाईची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत देण्यात आल्याची माहिती एमआयएमचे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इम्तियाज जलील म्हणाले, माझ्या विरोधात उभे भाजपचे मंत्री अबुल सावे यांच्या कार्यकर्त्यांनी गरीब, मुस्लिम चवस्त्यांत जाऊन एजंटांनी इलेक्शन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन पैसे देऊन शाई लावल्या जात होती. अनेक ठिकाणी बूथ कॅप्चर करण्यात आले. याउलट माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तीन मुस्लिम उमेदवारांना पैसे दिल्या गेले. त्यांनी नारेगाव, कैसर कॉलनी येथे मुद्दाम वाद निर्माण केले.

संविधान बदल करायला निघालेल्यांना मदत करणाऱ्या दलित समाजाच्या नेत्यांनी आंबेडकरनगर येथे महेंद्र सोनवणे व त्यांचे भाऊ जितेंद्र सोनवणे यांनी पैशांचे बंडल घेऊन पैसे वाटले. पैसे येईपर्यंत महिलांना मतदानाला जाऊ दिले नाही. कमळ कमळ म्हणून प्रचार करून महिलांना प्रत्येकी पाचशे रुपये वाटले, असा आरोप करून त्याचे व्हिडिओ आहेत. त्या पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

भारतनगरमध्ये बोगस मतदानाचा प्रयत्न

भाजप पदाधिकारी जालिंदर शेंडगे यांनी भारतनगर येथील बूथवर बाहेरील लोकांना घेऊन बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला. तेथील गैरमुस्लिम लोकांनी मला या गैरप्रकाराची कल्पना दिल्यावर मी उमेदवार म्हणून तिथे गेलो. एका महिलेकडे ओळखपत्र नसताना त्या महिलेने मतदान केले. त्या महिलेला मी महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे दिले असता त्या महिला कर्मचाऱ्याने हुज्जत घातली. जालिंदर शेंडगे व त्यांचे कार्यकर्ते तिथे जय श्रीरामच्या घोषणा देत होते. मी त्यांचे औक्षण करायला नव्हे, बोगस मतदान थांबवायला गेलो तर माझ्यावर गुन्हा दाखल केला, असा आरोप देखील जलील यांनी केला.

जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोर भाजप पदाधिकारी अॅड. अरविंद डोणगावकर यांच्या कार्यालयात मुस्लिम महिलांना रिक्षात बसवून आणले गेले. महिलांना एक हजार, दोन हजार रुपये देऊन महिलांच्या हाताला शाई लावली. यातील एजंट पोलिसांच्या ताब्यात दिला. त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. त्याचाही व्हिडिओ आहे, असेही जलील म्हणाले.

सावे यांनी दिले वाटण्यासाठी 2 कोटी

भाजप मंत्री आणि उमेदवार अतुल सावे यांनी जालिंदर शेंडगे, महेंद्र सोनवणे यांना दलित वसाहतीत वाटण्यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता २ कोटी रुपये दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांच्यावर निवडणूक विभाग कारवाई का करत नाही? काही कारवाई होईल याची मला अपेक्षा नाही पण मी सत्य समोर मांडले आहे, असे इम्तियाज जलील म्हणाले. निवेदनावर कारवाई झाली नाही म्हणजे अधिकाऱ्यांना देखील पैसे वाटले, असा अर्थ होईल.

मुंबईत मतमोजणीसाठी 2 हजार 700 कर्मचारी, 10 हजार पोलीस तैनात; 36 केंद्रांवर मतगणना

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे आणले होते

लोकसभेत माझा जनतेने पराभव केला नाही. एकनाथ शिंदे यांनी स्वतः हेलिकॉप्टरमधून पैसे आणले होते. ते पैसे लोकांमध्ये पुरवण्याचे काम पोलिसांवर होते. त्या पैशांनी माझा पराभव झाला. असा आरोप करीत त्यामुळे या यंत्रणावरील माझा विश्वास उडाला आहे, असे जलील म्हणाले. मी जे आरोप केले त्यात निवडणूक विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला. यंत्रणेला हे खोटे आहे, असे सांगावे. मी त्यावर काय पाऊल उचलायचे ते नंतर ठरवेल. अतुल सार्वेच्या आरोपावर त्यांनी प्रतिआव्हान देत सोबत पत्रकार परिषद घेऊ. आदर्श बँकेतील ठेवीदार लोकांचे शेत तुम्ही पीएच्या नावे विकत घेतले आहे. सांगा, एवढा पैसा आला कोठून, असा प्रश्नही जलील यांनी केला.

महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सत्तेवर येईल! 160 ते 165 जागा जिंकू, संजय राऊत यांचा ठाम विश्वास