दिल्लीत आज एक्यूआय म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स 400 च्या खाली आला. परंतु हवेच्या गुणवत्तेची ही नोंदही गंभीर असून दिल्ली पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्यांना दिल्लीत ऑनलाइन फटक्यांची विक्री थांबवण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी ई-कॉमर्स कंपन्यांना ई-मेल केले. सर्वोच्च न्यायालयाने प्रदूषणाचा सामना करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालावी, असे निर्देश दिले होते. तसेच फटाक्यांवर बंदी कायमस्वरूपी घालता येणार नाही का? असा सवालही केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ऑनलाइन फटाक्यांची विक्री थांबवण्याचे निर्देश दिले. दरम्यान, दिल्लीत श्रेणीबद्द प्रतिसाद कृती योजना-4(ग्रॅप-4) लागू आहे. बारावीपर्यंतचे सर्व वर्ग ऑनलाइन करण्यात आले आहेत.