मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा सोर्स असलेला मालमत्ता कर थकवणाऱया ‘बडय़ा’ थकबाकीदारांविरोधात पालिकेने कारवाईचा जोरदार बडगा उगारला असून मालमत्ता जप्तीची नोटीसच बजावली आहे. यामध्ये मुंबईतील दहा बडय़ा मालमत्ताधारकांचा समावेश असून त्यांनी पालिकेचा तब्बल 600 कोटींचा मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे पालिकेने बजावलेल्या नोटीसनुसार जप्त चीज वस्तूतूनही कर वसूल झाला नाही तर कलम 206 अन्कये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे थकबाकीधारकांना बजावण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारकाई सुरू करण्यात येते. मालमत्ता कर न भरणाऱया मोठय़ा थकबाकीदारांना पालिकेकडून कलम 203 अन्कये जप्तीची नोटीस बजावण्यात येते. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदर मालमत्तेवर कलम 204, 205, 206 अन्कये प्रथमतŠ मालमत्तेतील चीज कस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि करनिर्धारण व संकलन सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांना ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यासाठी महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळाकर माहिती उपलब्ध आहे.
अशी होते कारवाई
महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ता धारकास 21 दिकसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाक आदी कारवाई केली जाते.
असे आहे पालिकेचे टार्गेट
महापालिकेने चालू वित्तीय वर्ष मार्च 2024 ते एप्रिल 2025 साठी एकूण 4450 कोटी मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट ठेवले आहे. यातील आतापर्यंत 1372 कोटींची वसुली झाली आहे, तर 3178 कोटींची वसुली मार्चअखेरपर्यंत करणे बाकी आहे.
‘टॉप टेन’ मालमत्ता कर थकबाकीदार
- दि रघुवंशी मिल्स् लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – 119 कोटी 58 लाख 98 हजार 600 रुपये z मेसर्स ओंकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) – 104 कोटी 78 लाख 25 हजार 713 रुपये
- जे. कुमार इप्रास्ट्रक्चर लि. (एच पूर्क किभाग) – 71 कोटी 98 लाख 03 हजार 445 रुपये
- जे. कुमार इप्रास्ट्रक्चर लि. (एच पूर्क विभाग) – 67 कोटी 52 लाख 10 हजार 502 रुपये
- मेसर्स स्टर्लिंग इन्केस्टमेंट कॉर्पेरेशन लि.(जी दक्षिण विभाग) – 55 कोटी 10 लाख 56 हजार 956 रुपये
- मेसर्स किमल असोसिएट्स (के पूर्क विभाग) – 41 कोटी 74 लाख 11 हजार 215 रुपये
- दि रघुवंशी मिल्स् लि. (जी दक्षिण विभाग) – 38 कोटी 48 लाख 67 हजार 795 रुपये
- प्रोव्हिनंस लॅण्ड प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) – 33 कोटी 69 लाख 07 हजार 79 रुपये
- समीर एन. भोजकानी (के पश्चिम विभाग) – 33 कोटी 39 लाख 45 हजार 40 रुपये
- मेसर्स श्रीराम मिल्स् लि. (जी दक्षिण विभाग) – 33 कोटी 23 लाख 54 हजार 965 रुपये