फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान होणार आहे.
बोर्डाच्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर 21 नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या वेबसाईटवरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरूनच तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी अन्य वेबसाईटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देवीदास कुळाल यांनी केले आहे.
परीक्षांच्या तारखांचा तपशील
बारावी
लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च
प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी,
अंतर्गत मूल्यमापन –
24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी
दहावी
लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च
प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी,
अंतर्गत मूल्यमापन – 3 फेब्रुवारी ते 20 मार्च