इस्रायलला भुकेपंगाल करण्याच्या दिशेने ढकलल्याच्या तसेच मानवतेविरोधात पाऊल उचलल्याचा ठपका ठेवत आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांच्यासह हमासचा सैन्य कमांडर मोहम्मद जईफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. प्री ट्रायल चेंबरने न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात हे अटक वॉरंट जारी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मोहम्मद जईफ इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात मारला गेला होता. परंतु, हमासने आजपर्यंत याला दुजोरा दिलेला नाही.
इस्रायल आणि हमासदरम्यान सुरु असलेल्या युद्धादरम्यान कथित युद्ध गुन्हे आणि मानवतेविरोधातील गुह्यांसाठी तिघांना दोषी ठरवण्यता आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षणमंत्री योआव गॅलेंट हे देशाला भुकेपंगाल करण्याच्या दिशेने नेत आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे. इस्रायल आणि हमासने मात्र या दोघांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
गाझात युद्धविरामाच्या प्रस्तावावर अमेरिकेचा विटो
अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत गाझामध्ये युद्धविरामासाठी सादर केलेल्या प्रस्तावावर विटोचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. या प्रस्तावांतर्गत गाझामध्ये तत्काळ कुठल्याही अटीशर्तीविना कायमस्वरुपी तत्त्वावर युद्ध संपवले पाहिजे. तसेच सर्व ओलीसांना तत्काळ कुठल्याही अटीशर्ती न ठेवता सोडून दिले पाहिजे. सुरक्षा परिषदेच्या 15 सदस्यांपैकी 14 सदस्यांनी गाझामध्ये युद्ध विरामाच्या बाजूने मतदान केले.
गाझापट्टीत आतापर्यंत 44 हजार पॅलेस्टिनी ठार
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून 13 महिन्यांच्या कालावधीत इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टीत तब्बल 44 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. असा दावा पॅलेस्टिनी आरोग्यमंत्रालयाने केला आहे. दरम्यान, गाझापट्टीमध्ये किती नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झाला याबाबत कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, मरणाऱयांमध्ये मोठय़ा संख्येने महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर दुसरीकडे इस्रायली सैन्याने हमासच्या 17 हजार दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. याबाबत पुरावा मात्र दिलेला नाही.