आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहेत. यातील सहा नेते अलीकडेच भाजप आणि काँग्रेसमधून ‘आप’मधून आलेले आहेत. ब्रह्म सिंह तंवर, बीबी त्यागी आणि अनिल झा यांनी अलीकडेच भाजपला रामराम ठोकला होता. तर जुबैर चौधरी, वीर सिंह धिंगान आणि सुमेश शौकीन यांनी काँग्रेस सोडून ‘आप’मध्ये प्रवेश केला होता.
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे.गेली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी 2020 मध्ये झाली होती. आम आदमी पार्टाने पूर्ण बहुमत मिळवले होते आणि 70 पैकी तब्बल 62 जागा जिंकल्या होत्या. भारतीय जनता पार्टीला केवळ 8 जागा जिंकता आल्या तसेच काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते.