रशियाने युव्रेनमधील निप्रो शहरावर आज सकाळी इंटरकॉन्टिनेंटल क्षेपणास्त्र डागल्याचा दावा युक्रेनने केला आहे. हल्ले अस्राखान परिसरातून करण्यता आले. अस्राखान आणि निप्रो यांमध्ये तब्बल 700 किलोमीटर अंतर आहे. रशियाने डागलेल्या क्षेत्रणास्त्राची अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी चिघळणार असल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे युक्रेन अतिरंजित पद्धतीने वाढवून सांगत असल्याचा दावा अमेरिकेतील एबीसी न्यूज या वृत्तवाहिने पश्चिमी देशांमधील अधिकाऱयांच्या हवाल्याने केला आहे. याआधी बुधवारी युव्रेनने ब्रिटनचे स्टॉर्म शेडो क्रूज मिसाइल आणि मंगळवारी अमेरिकी एटीएसीएमएस या मिसाइलच्या माध्यमातून रशियात हल्ले केल्याचा दावा रशियाने केला होता. दरम्यान, युक्रेनच्या हवाई दलाने रशियाने इंटरकॉन्टिनेंटल क्षेपणास्त्राशिवाय रशियाने 7 केएच-101 क्रूज मिसाइलच्या माध्यमातूनही हल्ला केल्याचा दावा केला आहे. रशियाने गेल्याच महिन्यात नाटो देशांच्या शस्त्रास्त्रांचा वापर रशियाच्या भूमीवर झाला तर ही तिस्रया विश्वयुद्धाची सुरुवात समजली जाईल असा इशारा दिला होता. त्यामुळे आता हे युद्ध कोणते वळण घेणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.