राज्यात महाविकास आघाडीचं सरकार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, ”राज्यात महाविकास आघाडीच सरकार येणार. यांना सत्तेची आलेली मुजेरी ही जनतेला आवलेली नाही. वहिनींना बारामतीत थांबवणे, दाराबाहेर उभ करणे, अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक करुन त्यांचे डोके फोडले. जागोजागी पैसे नेणं, विनोद तावडेंसारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी मिळतात हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कसे रुचेल.”
आव्हाड म्हणाले की, ”ज्या शरद पवारांनी बारामती घडवली, त्यांच्या पत्नीला दाराबाहेर थांबवणे, आतमध्ये न जाऊ देणे, हे कुठल्या कायद्यात बसते? हे माणुसकीच्या कायद्यात बसत नाही, माणुसकी नसलेली माणसं आता राजकारणात आली आहेत, सर्व भागातील आमदार निवडून येतील त्यांची सख्या 160 च्यावर असेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.