Russia-Ukraine War – रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, पहिल्यांदाच बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले

रशिया-युक्रेनध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आणखी भडकले आहे. हे युद्ध गंभीर वळण घेत आहे. रशियाने गुरुवारी युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. ज्यामध्ये रशियाने आस्त्रखान प्रदेशातून युक्रेनच्या दक्षिण भागात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले आहे. अशा शक्तीशाली आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा पहिल्यांदाच वापर केला आहे. युक्रेनच्या हवाई दलाने याबाबत माहिती दिली आहे.

मॉस्कोकडून बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनने या आठवड्यात अमेरिका आणि ब्रिटेनच्या क्षेपणास्त्रांचा उपयोग करून रशियातील काही ठिकाणांना लक्ष्य केले. याविरोधात मॉस्कोने काही महिन्यांपूर्वी आधीच इशारा दिला होता. रशियाने मध्य पूर्व प्रदेशातील निप्रो शहरातील काही ठिकाणांना लक्ष्य केले. मात्र, इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने कोणाला लक्ष्य करण्यात आले आणि त्यामुळे काय नुकसान झाले, याबाबत स्पष्ट माहिती नाही.

इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा पल्ला हजारो किलोमीटर आहे आणि त्यांचा वापर अण्वस्त्रे हल्ल्यासाठी केला जाऊ शकतो. युक्रेनियन हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ल्यादरम्यान 6 KH-101 क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केली. रशियाच्या अस्त्रखान भागातून इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली. यात हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली. पण कोणत्या प्रकारचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र वापरले गेले, याची माहिती देण्यात आली नाही.