थोडे ज्ञान तुमच्या भविष्यासाठी…मोहम्मद शमी मांजरेकरांवर संतापला, इंस्टावर स्टोरी पोस्ट करत दिले उत्तर

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यावर चांगलाच संतापला आहे. त्याने मांजरेकर यांना थोडे ज्ञान तुमच्या भविष्यासाठी राखून ठेवा असा खोचकपणे सल्ला दिला आहे.

संजय मांजरेकर यांनी एका वक्तव्यात म्हटले होते की, शमीला ऑक्शनमध्ये हवी ती किंमत मिळणार नाही. शमीची दुखापत लक्षात घेता मांजरेकर यांनी हे वक्त्यव्य केले होते. आता शमीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक स्टोरी शेअर केली. त्यामध्ये त्याने लिहीले की, मांजरेकर यांची भविष्यवाणी लिहीली होती. जी त्याने हिंदुस्थानी पेसरबाबत केली होती. त्याखाली शमीने लिहीले की, बाबाजींचा जय असो. थोडे ज्ञान तुमच्या भविष्यासाठी राखून ठेवा, कामाला येईल संजय जी. कोणाला भविष्य जाणून घ्यायचे असेल तर सरांना भेटा असे त्यात लिहीले आहे.

गुजरातने शमीला 2022मध्ये मेगा ऑक्शनमध्ये आपल्या सोबत जोडले होते. 2022 मध्ये शमीने 16 सामन्यांमध्ये 20 विकेट घेतल्या होत्या. मग पुढच्या सीझनमध्ये आयपीएल 2023 मध्ये शमी 17 सामन्यांमध्ये 28 विकेट घेतले होतेय ज्यानंतर शमी त्या सिझनमध्ये सगळ्यात जास्त विकेट घेणारा गोलंदाज बनला होता. मात्र त्यानंतर 2024 चा सीझन शमी दुखापतीमुळे खेळू शकला नाही. ज्यानंतर फ्रेंचाइजीने त्याला मेगा ऑक्शनआधी सोडून दिले आहे.

मोहम्मद शमीने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये 110 आयपीएल सामने खेळे आहेत. या सामन्यांच्या 110 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 26.86 च्या सरासरीने 127 विकेट्स घेतल्या आहेत.