झाशी मेडिकल कॉलेजमधील आग प्रकरण; आणखी तीन नवजातांचा मृत्यू, मृतांची संख्या 15

झाशी मेडिकल कॉलेज आग प्रकरणात मृत बालकांचा आकडा वाढला आहे. आता आणखी तीन मुलांचा मृत्यू झाला असून ही संख्या 15 झाली आहे. आग लागल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 39 मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते, मात्र त्यापैकी काही मुलांची हालत गंभीर होती. आता बुधवारी आणखी तीन मुलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

झाशी मेडिकल कॉलेजमध्ये 15 नोव्हेंबर रोजी एनआयसीयू वॉर्डमध्ये आग लागून 10 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला होता. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान 39 मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. त्यांना मेडिकल क़ॉलेजच्या वॉर्ड 5 जिल्हा रुग्णालय, मउरानीपूर आणि दोन खासगी नर्सिंग होममध्ये भरती करुन उपचार केले जात होते. यापैकी काही मुलं आपल्या आई-वडिसांसोबत गेली होती.

रक्सा परिसरातील ग्राम बमेर निवासी लक्ष्मी- महेंद्र यांना 13 नोव्हेंबर रोजी मुलगा झाला होता. तो आजारी असल्याने डॉक्टरांनी त्याला 15 नोव्हेंबर रोजी मेडीकल कॉलेजसाठी रेफर केले होते. तिथे त्याला एनआयसीयू वॉर्डमध्ये भरती करण्यात आले.. त्याला सतत उचक्या येत होत्या. महेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, मुलाला रुग्णालयात भरती केल्यानंतर तो आणि पत्नी लक्ष्मी वॉर्डच्या बाहेर बसण्यासाठी कपडा अंथरत होते. दरम्यान किंचाळण्याचा आवाज आला. त्या दिशेने गेल्यावर आग लागल्याचे कळले. आम्हीही बाळाला बाहेर आणले. त्याला आम्ही खासगी रुग्णालयात घेऊन गेलो. दोन दिवसानंतर कळले की, तो आमचा मुलगा नाही. तर शेजारील गरौठा ठाणे परिसरातील ग्राम गोरपूरा निवासी कृपाराम यांचा मुलगा आहे, आमचा मुलगा दोन दिवस त्या रुग्णालयात बेवारस म्हणून होता. ज्यावेळी आम्हाला आमचा मुलगा भेटला त्यावेळी त्याची अवस्था गंभीर होती. त्याला ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

रक्षा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजना गावातील रहिवासी काजल-बॉबी या मुलाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला आणि मौरानीपूर येथील रहिवासी पूजा-कृष्णकांत या मुलाचा बुधवारी मृत्यू झाला. सीएमएस डॉ.सचिन माहूर यांनी तिन्ही बालकांच्या मृत्यूला दुजोरा देताना सांगितले की, रात्रीच त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. आतापर्यंत 10 मुलांचा आगीत तर 5 आजारपणामुळे मृत्यू झाला आहे.