बजाज नगरातील मतदान केंद्रावर पोलिसांचा लाठीहल्ला; मतदारांना पांगवले

 छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील बजाजनगरातील अलमान्सा शाळेच्या मतदान केंद्रावर मतदार मतदानासाठी रांगेत उभे असताना पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी ब्लॅक कमांडोसोबत घेऊन अचानक लाठीहल्ला सुरू केला. यामुळे मतदार पांगले यामध्ये एका महिलेच्या पायाला लागले, तर तीन जणांना जवळ असलेल्या नालीत पडल्याने दुखापत झाली.

बजाजनगरातील अलमान्सा इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी 4.45 वाजेच्या सुमारास पोलीस उपायुक्त नितीन बगाटे हे ब्लॅक कमांडोजच्या टीमसोबत दाखल झाले. कुठलीही गडबड, गोंधळ नसताना त्यांनी अचानक लाठीहल्ला सुरू केला. यामुळे मतदार घाबरून गेले. पळापळ सुरू झाली. यामध्ये 3 ते 4 जणांना दुखापत झाली. विशेष म्हणजे शांततेत मतदान सुरू असताना अचानक लाठीहल्ला सुरू झाल्यामुळेच तेथे हजर असलेल्या शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह शिवसैनिक अवाप् ॊझाले. त्यांनी संबंधितांना जाब विचारला, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी मतदान पेंद्राबाहेर रस्त्यावरच ठिय्या मांडला.