महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू असतानाच बीडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मतदान सुरू असतानाच मतदान केंद्रावर उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. बाळासाहेब शिंदे असे उमेदवाराचे नाव आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते. आज मतदानाच्या दिवशी ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालय येथील मतदान केंद्रावर थांबले होते. मतदान सुरू असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले.
परळीतील धर्मापुरी मतदान केंद्रावर बोगस मतदान सुरू, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आरोप
मतदान केंद्रावर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले. तिथे नेल्यावर डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
परळीत राडा
दरम्यान, बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघात काही समाजकंटकांनी मतदान केंद्र फोडले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram