महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संजय शिरसाट काही कार्यकर्त्यांना शिवीगाळ आणि दादागिरी करताना दिसत आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ शेअर करत शिरसाट यांच्या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन कारवाई करणार का असा सवालही केला आहे.
संजय शितसाट यांचीही कोणती पद्धत बोलायची! या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन @ECISVEEP @CEO_Maharashtra आणि @DGPMaharashtra कारवाई करणार का? #MaharashtraElection2024 #महाराष्ट्र pic.twitter.com/Nz8tMc5TET
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 20, 2024
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये संजय शिरसाट काही नागरिकांना मस्ती आली का तुला…अशी दमदाटी करत शिव्या घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत दानवे यांनी संजय शिरसाट यांची ही कोणती पद्धत बोलायची. या खुलेआम धमक्यांची दखल घेऊन @ECISVEEP @CEO_Maharashtra आणि @DGPMaharashtra कारवाई करणार का? असा थेट सवालच केला आहे. शिवाय पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केले आहे.
काय चुकलं आमच्या कार्यकर्त्यांचे.. ज्यांनी चुकीच्या गोष्टींना विरोध केला त्यांना शिरसाट शिवराळ भाषेत बोलतात. पायाखालची वाळू सारकलीच नाही तर गायब झाली आहे.. pic.twitter.com/BHhqqloZkI
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 20, 2024