ऑस्कर पुरस्कार विजेता गायक ए आर रहमान आपल्या संसारीक जीवनात अपयशी ठरला आहे. ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी आपला 29 वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ए आर रहमानच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.
ए आर रहमान आणि सायरा बानो यांचा 12 मार्च 1995 रोजी चेन्नई येथे विवाह झाला होता. त्यांना खातिजा, रहिमा आणि अमीन अशी तीन मुले आहेत. रेहमान आणि सायराच्या वकिलाने एक जाहीर निवेदन जारी करून या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. नातेसंबंधातील अनेक वर्षांच्या भावनिक ताणावानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सायरो बानोच्या म्हणण्यानुसार, या नात्यात तिला खूप वेदना होत होत्या, ज्या सांभाळणे तिच्यासाठी खूप कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी नाते तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नात्यात निर्माण झालेली दरी दोघांनाही भरून काढता आली नाही. त्यामुळे हे नाते वाचवू शकत नाही.