शुबमन अॅडलेडवर खेळणार

एकीकडे न्यूझीलंडकडून मायदेशातच दणकून पराभव पत्करल्यानंतर हिंदुस्थानी संघाचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. त्यातच ‘बॉगाक’ कसोटी मालिकेत आता हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात भिडायचे आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल हे दोघेही पर्थवर खेळत नसले तरी अॅडलेडवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत गिल खेळणार असल्याची आनंदाची बातमी मिळाली आहे.

पर्थ कसोटीसाठी सराव करत असताना शुबमन गिलच्या अंगठय़ाला दुखापत झाली होती. मात्र त्याचे एमआरआय स्पॅन काढण्यात आल्यानंतर त्याच्या अंगठय़ाला प्रॅक्चर झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘शुबमन गिलचा अंगठा सुजलेल्या अवस्थेतच आहे. त्याचा अंगठय़ाचा एमआरआय स्पॅन काढण्यात आल्यानंतर हलकीशी दुखापत झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याला या दुखापतीतून बरा होण्यासाठी दोन आठवडय़ांचा कालावधी लागणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यामध्ये खूप अंतर असल्यामुळे तो दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.