लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) संघातून मुक्त केलेल्या केएल राहुलला आगामी लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रेंचायझी विकत घेईल, असा विश्वास हिंदुस्थानचे महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे. एलएसजीने राहुलला संघातून मुक्त करताना निकोलस पूरन, रवी बिश्णोई, मयंक यादव, मोहसीन खान आणि आयुष बदोनी यांना संघात कायम ठेवले होते. या लिलावात दाक्षिणात्य फ्रेंचायझी आपल्या स्टार खेळाडूला संघात घेण्यासाठी मोठी बोली लावतील आणि बोली लावणारे संघ बंगळुरू आणि चेन्नईचेच असतील. हैदराबादही राहुलसाठी मैदानात उतरतील, पण बंगळुरू त्याच्यासाठी मोठी किंमत मोजतील. हेच संघ राहुलला आपल्या संघात खेळविण्यासाठी उत्सुक आहेत. राहुलचीसुद्धा आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची मनापासून इच्छा असेल आणि ती यावेळी नक्कीच पूर्ण होईल, असेही ते आवर्जून म्हणाले.