भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप बविआकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते विनोद तावडे विरारमध्ये पैसे वाटत केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरार पूर्वेला असणाऱ्या मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे आले होते. त्यावेळी बविआचे कार्यकर्ते तेथे पोहचले आणि विनोद तावडे पैसे वाटत असताना त्यांना पकडले. आता या प्रकरणात आणखी गोष्टी उजेडात येत आहेत.
याबाबत हितेंद्र ठाकूर म्हणाले की, 5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. तसेच हॉटेलमध्ये 5 कोटी आणले होते. त्यातील फक्त 9 लाख दाखवण्यात आले आणि इतर रक्कम गायब करण्यात आली, असा आरोपही ठाकूर यांनी केला आहे. विनोद तावडे यांच्या हॉटेलमधील खोलीतून सुमारे 10 लाखांची रक्कम सापडल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आता ठाकू यांच्या या आरोपामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.