एका केळ्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये? नेमके कारण तरी काय…

सध्या देशात सर्वच जीवनावश्यक गोष्टीच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये फळांचाही समावेश आहे. प्रामुख्याने केळ्यांचे भावही वाढले आहे. मुंबईत 1 डझन केळ्यांची किंमत 65 रुपये इतकी आहे. मात्र न्यूयॉर्कमध्ये एका केळ्याची किंमत 8 करोड रुपये इतकी आहे. या केळीत असे काय विशेष आहे की लोक ते विकत घेण्यासाठी इतके पैसे देण्यास तयार आहेत. जाणून घेऊया कारण-

न्यूयॉर्कमध्ये एका भिंतीवर टेपने चिटकवलेल्या या केळ्याचा लिलाव होणार असून, त्याची अंदाजे किंमत 1 मिलियन डॉलर्स (म्हणजे 8 कोटींहून अधिक) ठेवण्यात आली आहे. मात्र, ही एका कलाकाराची कलाकृती आहे. टेपने भिंतीला चिकटवलेले हे केळं एक इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलनची कलाकृती आहे. ज्याला त्याने ‘ कॉमेडियन ‘ असे नाव दिले आहे . त्यांनी ते व्यंग्यात्मक शैलीत मांडले आहे. त्यामुळे हे एक केळे जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. सोथबी ऑक्शन हाऊसद्वारे त्याचा ऑनलाइन लिलाव केला जात आहे.

‘कॉमेडियन’ ही मॉरिझिओच्या सर्वात प्रतिष्ठित कलाकृतींपैकी एक आहे. यामुळेच त्याची किंमत 1 दशलक्ष डॉलर्स ठेवण्यात आली आहे. यापूर्वी मॉरिझियोच्या काही कलाकृतींची 142 कोटींहून अधिक किंमतीला विक्री झाली आहे. मात्र ही कलाकृती काही वेगळीच आहे. भिंतीवर चिकटवलेल्या केळ्याच्या एकूण तीन कलाकृती होत्या. त्यापैकी दोन विकल्या गेल्या आहेत. तुम्हाला ही कलाकृती विकत घ्यायची असल्यास www.sothebys.com अधिकृत वेबसाइट वर जाऊन बोली लावू शकता.