विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे हे पैसे वाटायला आले होते असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. तसेच जेव्हा बविआचे कार्यकर्ते आले तेव्हा तावडे किचनमध्ये लपले होते असा दावा बविआच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांनी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सकाळपासून तावडे विरारमध्ये आले होते. जेव्हा आम्ही त्यांना पकडलं तेव्हा त्यांच्याकडे 9 लाख रुपये कॅश सापडली. तावडे यांनी सकाळपासूनच ही कॅश वाटली होती. तावडे यांच्या सचिवाकडे ही पैश्यांची बॅग होती असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला विरारच्या हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटत असल्याची माहिती दिली. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि तावडेंना जाब विचारला.
बविआचे कार्यकर्ते म्हणाले की, आम्ही सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास या हॉटेलमध्ये आलो. तेव्हा विनोद तावडे उपस्थित होते. एवढा मोठा केंद्रीय नेतृत्वाचा माणूस किचनमध्ये लपावं अशी परिस्थिती अजिबात नव्हती. जेव्हा तावडे लपले होते तेव्हा त्यांच्या एका पीएकडे 9 लाख रुपये रोख रक्कम असलेही बॅग होती असेही कार्यकर्त्यांनी म्हटले.
या सगळ्या प्रकारानंतर बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीत गेले. त्यावर कार्यकर्ते म्हणाले की तावडे सुखरुप जाण्यासाठी ठाकूर त्यांच्यासोबत गाडीत होते. जर ठाकूर तावडे यांच्यासोबत नसते तर धोका निर्माण झाला असता असेही कार्यकर्त्यांना सांगितले.