भारतीय जनता पक्षाचे बडे नेते विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. विरार पूर्व येथील विवांत हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावरून जोरदार राडाही झाला. बविआ कार्यकर्त्यांनी विनोद तावडे आणि भाजप उमेदवार राजन नाईक यांना घेराव घातला. यावेळी हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूरही हॉटेलमध्ये उपस्थित होते. पैसे वाटपाच्या आरोपांमुळे गोंधळ उडाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला. यावर हितेंद्र ठाकूर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन आले होते. हॉटेलमध्ये दोन डायऱ्याही सापडल्या असून यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीचीही नोंद आहे. सदर ठिकाणी पोलीस पोहोचले असून आम्ही याबाबत तक्रार करार आहोत. सरकार यांचेच असल्याने तक्रारीचे पुढे काय होणार हे माहिती आहे, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले.
पैशांसह पकडल्यानंतर विनोद तावडे यांचे सारखे मला फोन येत होते. मला सोडवा, मला माफ करा. माझी चूक झाली. अशी विनंती विनोद तावडे करत होते. त्यांनी तब्बल 25 वेळा मला फोन केला, असा दावाही हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
डायरीत 15 कोटींची नोंद
दरम्यान, विनोद तावडे यांच्याकडे दोन डायऱ्याही सापडल्या असून त्यात 15 कोटींची नोंद असल्याचा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी पैशाचे राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे.
भविष्यात डोईजड होतील म्हणून भाजपमधूनच तावडेंचा गेम झाला, संजय राऊत यांचा मोठा दावा