विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही तास बाकी असताना सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना भुलवण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बोटाला शाई लावून, वोटिंग आणि आधार कार्ड ताब्यात घेऊन पैसे वाटप सुरू असल्याचे सोमवारी सायंकाळी उघडकीस झाले. यामुळे खळबळ उडालेली असतानाच आता पश्चिम मतदारसंघात देवळाई तांडा येथे मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यासाठी पैशाचे खुलेआम वाटप करताना भाजपचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते कैद झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरात मिंधे गटाने पैशाचा अक्षरशः बाजार मांडला आहे. मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यासाठी पैशाचे खुलेआम वाटप करताना भाजपचे माजी नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे व भाजप कार्यकर्ते कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत मिंधे गटाचा भंडाफोड केला आहे.
निवडणुकीपूर्वीच मिंध्यांचं मतदान सुरू; वोटिंग, आधार कार्ड ताब्यात घेऊन पैसे वाटप, दोघांना अटक
आता यापेक्षा मोठा पुरावा निवडणूक आयोगाला कोणता हवा! देवळाई तांडा भागातील हा प्रताप आहे. कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका? असा सवाल अंबादास यांनी केला आहे.
आता यापेक्षा मोठा पुरावा @ECISVEEP आणि @CEO_Maharashtra ला कोणता हवा! देवळाई तांडा भागातील हा प्रताप आहे. कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका? #MaharashtraElection2024 pic.twitter.com/qGnkbpSNt1
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 19, 2024
व्हिडीओमध्ये काय आहे?
देवळाई तांडा येथे भाजपचे माजी नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे व भाजप कार्यकर्ते दिसत आहे. एका एका मतासाठी पैशाचे वाटप यात सुरू आहे. तुमची किती मतं? 8 मतं… तर हे घ्या 4 हजार… आणखी कुणाची किती मतं? हे घ्या 1500 रुपये… नावांची नोंद करा, असा प्रकारचं संभाषण यात होताना दिसत आहे. हाच व्हिडीओ अंबादास दानवे यांनी शेअर केला असून निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.
View this post on Instagram