मुंबईला लुटण्यासाठीच महायुतीला महाराष्ट्रात सत्ता हवी, कन्हैया कुमार यांचा महायुतीवर घणाघात

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्यासाठी महायुतीचे नेते महाराष्ट्राची सत्ता मागत आहेत, असा घणाघात काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी केला.

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अस्लम शेख यांच्या प्रचारार्थ कन्हैया कुमार यांनी रविवारी आझमी नगर परिसरात प्रचारसभा घेतली. या वेळी त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. भाजपचे नेते घराणेशाहीवर बोलतात, मात्र मालाड पश्चिममध्ये स्थानिक उमेदवारांना डावलून भाजप नेत्याच्या भावाला येथे उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याच्या दावा पंतप्रधान करतात, मग ते कोण 80 कोटी लोक आहेत जे पाच किलो धान्यासाठी रांगेत उभे राहतात, असा सवालही त्यांनी पेंद्र सरकारला विचारला.

धान्याला भाव नाही

आज शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळत नाही, मात्र शेतकऱयांना शेतीसाठी लागणारी अवजारे, बी-बियाणी दामदुप्पट दराने विकत घ्यावी लागतात.

व्यापाऱ्यांनी सरकार पाडले

दोन व्यापाऱ्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, आता त्याच दोन व्यापाऱयांना देश विकला जातोय, असा आरोप कन्हैया कुमार यांनी केला.