>> देवेंद्र भोगले
भायखळा विधानसभेत महाविकास आघाडी की महायुती जिंकणार या प्रश्नाचे उत्तर निश्चितच महाविकास आघाडी असेच असेल. मतांच्या गणितानुसार यामागचे प्रमुख कारण म्हणजे येथील एकूण मतदारांपैकी 41.5 टक्के मते ही मुस्लिम बांधवांची आहेत. मोदी सरकार उलथवण्यासाठी लोकसभेत याच मुस्लिम बांधवांची मते निर्णायक ठरली होती आणि आता विधानसभेतही तीच एकगठ्ठा मते महाविकास आघाडीच्या पारडय़ात पडतील अशी थिअरी राजकीय तज्ञांनी मांडली आहे.
भायखळा मतदारसंघात शिवसेनेची मशाल घेऊन रिंगणात उतरलेले उमेदवार मनोज जामसुतकर आणि मिंधे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये निर्णायक मते भायखळ्यात मिळाली होती. साहजिकच त्यात मुस्लिम मतांचा मोठा वाटा होता. लोकसभेत शिवसेनेला भायखळ्यातून एकूण मतांपैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे 54.56 टक्के मते मिळाली होती. दुसरीकडे यामिनी जाधव यांना लोकसभेत सर्वाधिक कमी मते त्यांच्याच भायखळ्यात मिळाली होती. शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सामील झाल्यानंतर यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्याबद्दल मतदारांच्या मनात चीड आहे.
मुस्लिम, मराठी, जैन, ख्रिश्चन बांधवांनाही परिवर्तनाची आस
पूर्वी भायखळा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखळा जायचा. परंतु नंतर या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व वाढले. 2014च्या विधानसभा निवडणुकीत ‘एआयएमआयएम’चे वारीस पठाण या मतदारसंघातून आमदार झाले होते ते मुस्लिम मतांच्या बळावर. 2019मध्ये पुन्हा शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी काwल दिला. मुस्लिम मतांप्रमाणेच इथे मराठी आणि अमराठी मतदारांचीही चांगली संख्या आहे. जैन बांधवांची 2.3 टक्के तर ख्रिश्चन बांधवांची 2 टक्के मते इथे आहेत. त्यांना परिवर्तनाची आस आहे.