लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेत अटक; कॅलिफोर्नियातील पथकाची कारवाई 

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिनश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियातील अंमलबजावणी पथकाने त्याला अटक केली आहे. त्याच्यावर 18 फौजदारी खटले दाखल आहेत. तसेच त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी लॉजिस्टिक्स आणि शस्त्रे खरेदी करण्यात त्याचा हात आहे, असा आरोपही त्याच्यावर आहे. त्याच्याविरोधात अजामीपात्र वॉरंट बजावण्यात आले होते.

कॅलिफोर्नियातील कायदा अंमलबजावणी पथकाने त्याला अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात आहे. तो तुरुंगात असताना त्याचे सर्व नेटवर्क अनमोल अमेरिकेतून चालवत होता. अनमोलवर 18 गुन्हे दाखल आहेत, तर एनआयएने त्याच्या अटकेसाठी 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येशीही संबंधीत आरोपही त्याच्यावर आहेत. या हल्ल्याने नियोजन त्याने केले होते. तसेच यासाठी शस्त्रेही खरेदी केली होती. पोलीस तपासात असा दावा करण्यात आला आहे की, अनमोलने आरोपींना शस्त्रांसह आर्थिक मदत केली होती. अनमोलवर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा आणि बॉलीवूडमधील व्यक्तींवर हल्ले करण्याचा कट रचल्याचाही आरोप आहे. सलमान खान याच्या घरावरील हल्लामागेही त्याचा हात असल्याचा आरोप आहे.