दलिबोर सेव्हर्सिनाला विजेतेपद

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आयोजित पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या दलिबोर सेव्हर्सिना याने विजेतेपद संपादन केले. एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात एकेरीत अंतिम फेरीत दुसऱया मानांकित चेक प्रजासत्ताकच्या दलिबोर सेव्हर्सिना याने उझबेकिस्तानच्या अव्वल मानांकित खुमोयून सुलतानोवचा 3-6, 6-1, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 2 तास 12 मिनिटे चालला. दलिबोर याचे हे दोन आठवडय़ांतील दुसरे विजेतेपद आहे. पहिला सेट गमावल्यानंतर दलिबोरने अव्वल मानांकित खुमोयूनविरुद्ध दुसऱया व तिसऱया सेटमध्ये अफलातून खेळ करत विजय मिळवला.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक, 3600 डॉलर (3 लाख रुपये), 25 गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक, 2120 डॉलर (1 लाख 80 हजार रुपये), 16 गुण अशी पारितोषिके देण्यात आली.