सुनील प्रभूंची हॅट्ट्रिक होणार, दिंडोशीत विकास पर्व!

>> मंगेश मोरे

दिंडोशी मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सुनील प्रभू तिसऱयांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर शिंदे गटातर्फे संजय निरुपम आणि मनसेचे भास्कर परब निवडणूक लढवत आहेत. आधी मुंबईचे महापौर व नंतर दोनदा विधानसभेत प्रतिनिधित्व करीत प्रभू यांनी मुंबईला ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यात मोठे योगदान दिले. त्यांनी अनेक विकासकामे करून दिंडोशी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. जनसेवेसाठी सदैव तत्पर लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना मतदारांची अधिक पसंती मिळेल व ते आमदारकीची हॅटट्रिक करतील, असे चित्र मतदारसंघात दिसत आहे.

दिंडोशी मतदारसंघाला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रातील 25 हजार कुटुंबांतील मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. मतदारसंघात दिंडोशी, संतोष नगर, नागरी निवारा परिषद, मालाड पूर्वेकडे कुरार व्हिलेज, आप्पापाडा, कोकणीपाडा, कन्यापाडा, पिंपरीपाडा, इंदिरा नगर आदी भागांचा समावेश होतो. मतदारसंघात एकूण 3,06,502 मतदार आहेत. त्यात मराठी मतदार 1,32,825 असून उत्तर भारतीय मतदार 90,013 तर अल्पसंख्याक मतदार 37,253 इतके आहेत.

स्थानिक लोकप्रिय उमेदवार विरुद्ध आयात उमेदवार

मतदारसंघात सुनील प्रभू यांची खूप लोकप्रियता आहे. ते स्थानिक उमेदवार असून समाजकार्य व शिवसेनेशी एकनिष्ठ, धडाडीचा नेता, मनमिळावू स्वभाव अशी त्यांची ओळख आहे, तर शिंदे गटाचे संजय निरुपम आयात उमेदवार आहेत. या दोघांत लढत होणार असल्याचे चित्र आहे.

विकासकामांच्या जोरावर प्रभूंची प्रचारात सरशी

2014 व 2019मध्ये विधानसभेत गेलेल्या सुनील प्रभू यांनी दोन्ही टर्मला विकासकामांचा जोरदार धडाका लावला. रस्ते, पाणी यांसारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासह दिंडोशी, मालाड विभागात विविध उद्याने, समाज मंदिरे, धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंती तसेच 450 शौचालयांची निर्मिती केली. अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे केल्याने वाहतुकीचा वेग वाढला. आप्पापाडा नागरी प्राथमिक आरोग्य पेंद्रात मल्टीस्पेशालिटी ओपीडी तसेच इतर आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. तसेच गुन्हेगारीसाठी ओळखला जाणारा कुरार-मालाड परिसर सुरक्षित बनवला. या विकासकामांच्या जोरावर प्रचारात प्रभू यांची सरशी दिसत आहे.

सर्वसामान्य जनतेचा आवाज

सुनील प्रभू हे 1997मध्ये मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 2012पर्यंत चार टर्म तेच नगरसेवक राहिले. 2012 ते 2014 या अवधी त्यांनी मुंबईचे महापौर पद भूषवले. त्यानंतर 2014पासून आतापर्यंत ते आमदार म्हणून जनसेवेत सक्रिय राहिले आहेत. विधानसभेत शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून त्यांनी दिंडोशी मतदारसंघासह मुंबई व राज्याचे प्रश्न मांडले.

पुरुष मतदार 1,73,540
स्त्राr मतदार 1,32,938
एकूण मतदार 3,06,502