Miss Universe 2024: डेन्मार्कच्या व्हिक्टोरियाने जिंकला मिस युनिव्हर्सचा किताब

मिस युनिव्हर्स 2024 ची घोषणा झाली आहे. डेन्मार्कची 21 वर्षीय स्पर्धक व्हिक्टोरिया केयर थेलविगने हे विजेतेपद पटकावले आहे. व्हिक्टोरिया ही आपल्या देशासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली महिला आहे. तिच्या अप्रतिम कामगिरीने आणि उत्तरांनी जजेसना प्रभावित केले. त्यामुळे तिने मिस युनिव्हर्स 2024 या किताबावर आपले नाव कोरले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss Universe (@missuniverse)

मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान मिस युनिव्हर्स 2024 ची पहिली रनर अप ठरली. तर नायजेरियाच्या Cnidimma Adetshina हिने द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे देशभरातून त्याचे कौतुक होत आहे. व्हिक्टोरियाने मिस युनिव्हर्स चा किताब मिळवल्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र तिचीच वाह वा केली जात आहे. चाहत्यांनी तिला या यशासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. चाहत्यांना तिची हुशारी आणि सौंदर्य पाहून वेड लागले आहे.

21 वर्षीय व्हिक्टोरिया ही व्यवसायाने उद्योजक, नृत्यांगना आणि ब्युटी क्वीन आहे. ती डेन्मार्कमध्ये लहानाची मोठी झाली. तिने बिझनेस आणि मार्केटिंगमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर तिने मिस डेन्मार्क या सौंदर्य स्पर्धांतून वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. यानंतर 2022 मध्ये तिने मिस ग्रँड इंटरनॅशनलमध्ये टॉप 20 मध्ये स्थान मिळवले होते. तेव्हापासून व्हिक्टोरिया प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर आता व्हिक्टोरियाने मिस युनिव्हर्स 2024 हा किताब जिंकला आहे.