संपूर्ण देशातून भाजपने महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी 90 हजार लोक आणलेत, त्यात सर्वाधिक लोक हे गुजरातचे आहेत, असा दावा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने टीका केली आहे. आपण आपला महाराष्ट्र गुजरातच्या हाती द्यायचा का? असा सवाल पक्षाने उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या एक्सवर एक भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात पंकजा मुंडे एका प्रचार सभेत बोलत आहेत की राज्यात 90 हजार बुथ आहेत. त्यासाठी 90 हजारो लोक महाराष्ट्रात निवडणुकीसाठी आले आहेत. यातील बहुतांश लोक हे गुजरातमधून आले आहेत. एवढे लोक आल्याने आमचा ऑक्सिजन कमी झाला असेही मुंडे म्हणाल्या.
यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने म्हटलंय की बाबो ! महाराष्ट्रात निवडणुकीचं काम करायला 90 हजार माणसं आणली आणि त्यात जास्त गुजरातवरून आली आहेत. याचा अर्थ गुजरातने आता महाराष्ट्राचे बूथही हडपले आहेत. भविष्यात भाजपच्या हाती सत्ता गेली तर भाजप गुजरातला आंदण म्हणून काय काय देईल ह्याची कल्पना करा… भाजपचे मनसुबे आता स्पष्ट झाले आहेत पण आपण आपला महाराष्ट्र गुजरातच्या हाती द्यायचा का? असा सवाल करत ही महाराष्ट्रद्रोही महायुती आहे अशी टीकाही केली आहे.
बाबो ! महाराष्ट्रात निवडणुकीचं काम करायला ९० हजार माणसं आणली आणि त्यात जास्त गुजरातवरून आली आहेत. ह्याचा अर्थ गुजरातने आता महाराष्ट्राचे बूथही हडपले आहेत. भविष्यात भाजपच्या हाती सत्ता गेली तर भाजप गुजरातला आंदण म्हणून काय काय देईल ह्याची कल्पना करा… भाजपचे मनसुबे आता स्पष्ट… pic.twitter.com/ttFyq2GUEj
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 17, 2024