Manipur violence – मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासह मंत्री-आमदारांच्या घरांवर हल्ला

गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून मणिपुरमध्ये सुरु असलेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीय. शनिवारी मणिपूरमधील जिरीबाममधून अपहरण करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह शनिवारी सापडल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शनिवारी इंफाळमध्ये संतप्त लोकांनी रस्त्यावर उतरून दोन मंत्र्यांसह तीन आमदारांच्या निवासस्थानांना घेराव घालून तोडफोड सुरू केली. घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांनी तीन आमदारांची घरे जाळली. मंत्र्यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यानंतर संतप्त जमावाने मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला केला. संपप्त जमावाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंफाळ पश्चिम प्रशासनानेन अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.

राज्य प्रशासनाने इंफाळ पश्चिम, पूर्व, बिष्णुपुर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचांदपुर मध्ये दोन दिवसांपासून इंटरनेट आणि मोबाईल डाटा सेवा दोन दिवसांसाठी बंद केले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांच्या जमावाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या लाम्फेल सनाकेथेल परिसरातील निवासस्थानावर हल्ला केला. शिवाय, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद भागात आमदार आरके इमो यांच्या घरासमोर आंदोलक जमले आणि घोषणाबाजी केली. इमो हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे जावई देखील आहेत. याशिवाय आंदोलक केशमथोंग विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार सपम निशिकांत सिंह यांना भेटायला गेले, मात्र ते न सापडल्याने त्यांनी त्यांच्या मालकीच्या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या इमारतीला लक्ष्य केले.मणिपूरच्या मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला केला.

कुकीच्या बंडखोरांनी काही दिवसांपूर्वी जिरीबाम जिल्ह्यात हल्ला केला होता. यावेळी सुरक्षा जवानांनी जवळपास 10 बंडखोरांचा खात्मा केला होता. संशयित कूकीच्या बंडखोरांनी मैतेई समाजाच्या तीन महिला आणि तीन मुलांना ओलीस ठेवले होते. पाच दिवसानंतर पोलिसांनी ते सहा सापडले.